GADEKAR SUJATA JANARDHAN

अपक्षरण कारके
                               अपक्षरण कारके  – १
                                   अपक्षरण संकल्पना
       भूमिरूपविज्ञानाचा सैद्धांतिक पाया  विल्यम मॉरिस डेव्हिस यांनी घातल्याचे मानतात. विविध प्रक्रियांनी भूपृष्ठाची झीज होत राहून भूपृष्ठाचे स्वरूप टप्प्या-टप्प्याने बदलते व भूमिरूपे (किंवा भूदृश्य) उत्क्रांत होत असतात, हा अनुमानिक सिद्धांत त्यांनी मांडला. याला अपक्षरण, क्षरण अथवा भूमिरूपचक्र असेही म्हणतात. सर्व भूमिरूपांची संरचना, त्यांवर कार्य करणाऱ्या प्रक्रिया आणि त्यांकरिता लागणारा काळ या गोष्टींचे स्पष्टीकरण या सिद्धांताद्वारे करता येते. असे डेव्हिस यांचे मत होते.
       भूपृष्ठावर उघड्या पडलेल्या खडकांवर पाणी (उदा., नद्या), वारा, हिमनद्या, लाटा, जीव, जलवायुविज्ञान (दीर्घकालीन सरासरी हवामान), गुरुत्व इ. कारकांचा सतत परिणाम होत असतो. त्यामुळे भूपृष्ठाची सतत झीज व भर होऊन भूदृश्य बदलत असते. भूमिजलाचा भूमिरूपांवर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारे पर्वत, दऱ्या, घळी, खोरी, पूरभूमी, जलोढ पंखे, डोंगरांचे उतार व माथे, सागरी गुहा, पठारे, द्रोणी, कॅन्यन, निदऱ्या, छत्री खडक, मेसा, ब्यूट, शैलभिंती, वाळवंटे, ड्रमलीन, हिमस्थगिरी, हिमगव्हरे, त्रिभुज प्रवेश, वालुकाभिंती (दांडे), पुळणी, लोएस, वालुकागिरी, मैदाने, एस्कर, प्रवाळभिंती इ. अनेक भूमिरूपे निर्माण होतात आणि ती सावकाशपणे सतत बदलत असतात.


                 Description: Related image
    
                                     नदी
नदी जास्तीत जास्त समुद्रसपाटीपर्यंत झीज करू शकते म्हणून सागरपातळी ही झीजेची निम्नतम पातळी आहे, हे प्रतिपादन केले. या आधारसामग्रीवर विल्यम मॉरिस डेव्हिसने १८८४ साली क्षरणचक्र ही महत्त्वाची संकल्पना मांडली. उगमापासून मुखापर्यंत नदी विविध भूरूपे तयार करते. नदीच्या वयानुसार तिची क्षमता वाढते. वाढलेल्या क्षमतेनुसार ती प्रदेशाची झीज करते.नदीच्या खोऱ्यातील खडक, माती वगैरेंचे स्वरूप व रचना आणि नदीप्रवाहाचे त्यावरील कार्य यांमुळे नदीप्रणालीला विशिष्ट रूप प्राप्त होते. त्याला निःसारण प्ररूपम्हणतात.अपक्षरण क्रियेमुळे नदीच्या पात्राची जलधारणक्षमता कमी होऊन पुराचे प्रमाण वाढते. पुराच्या वेळी नदीची वहनशक्ती वाढते. प्रवाहाचा वेग दुप्पट झाल्यास वहनक्षमता वेगाच्या ६४ पटींनी वाढते. पुरांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करताना पूराधीन प्रदेशातील जलविज्ञान, मृद्संधारण, पर्जन्यमान, तपमान, आर्द्रता, बाष्पीभवन यांसारख्या गोष्टींचा काटेकोरपणे विचार करावा लागतो. जमिनीखालून वाहणारे पाण्याचे प्रवाह, त्यांचा वेग, जमिनीची धूप व तत्सम घटकांची आकडेवार व तपशीलवार माहिती गोळा करणे आवश्यक असते.

             Description: F:\(Russia) – Kamchatka – The land of true wilderness 1.jpg

                   घळई
   घळई हे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे. नैसर्गिकरीत्या एकत्रित झालेला पाण्याचा ओघ गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे भूपृष्ठावर उतारच्या दिशेने वाहू लागतो व स्वत:चा मार्ग आखत जातो.याला जलप्रवाह म्हणतात. असे अनेक जलप्रवाह एकत्र येऊन नदीची निर्मिती होते
                .

                           V आकाराची दरी
व्ही आकाराची दरी हे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे. दरी निर्माण होण्यास कारणीभूत असलेला प्रमुख घटक म्हणजे नदीचे अपक्षय (झीज) कार्य होय. आरंभीच्या टप्प्यात नदी डोंगराळ भागातून, तीव्र उतारावरून वाहत असल्याने पाण्याचा प्रवाह फार वेगवान असतो. त्यामुळे प्रवाहाबरोबर वाहून येत असलेले दगड, धोंडे, वाळू इत्यादींसह प्रवाह भूभागावर आदळतो, तेव्हा तो त्याचा पृष्ठभाग खरवडून काढण्याचे म्हणजे दरी निर्माण करण्याचे कार्य करतो. प्रवाहमार्गाच्या तळावर व कडांवर पाण्याचे आणि दगडधोंड्यांचे जोराने घर्षण होऊन तेथील पृष्ठभाग खरवडून काढला जातो. प्रवाहाच्या काठापेक्षा तळावर अधिक घर्षण झाल्यामुळे नदीचा तळ जास्त खोल होत जातो व काही काळानंतर नदीच्या पात्राला इंग्रजी ‘व्हीअक्षरासारखा आकार प्राप्त होतो. अशा प्रकारे निर्माण झालेल्या भूरूपाला नदीची दरी म्हणतात. अरूंद इंग्रजी व्हीआकाराच्या दऱ्या भूपृष्ठावर सामान्यतः अतिपर्जन्याच्या व मृदू खडकांच्या प्रदेशात आढळतात.
                 


                                                     
                   कुंभगर्त
नदीच्या पात्रातील खडकात तयार झालेला रांजणाच्या आकाराचा खळगा. नदीप्रवाहाच्या, विशेषत वरच्या टप्प्यात, पाण्याबरोबर वेगाने वाहत आलेले दगडगोटे पात्रातील खडकावर घासू लागतात. पाण्याच्या लहानमोठ्या  भोवर्‍यांबरोबर या दगडगोट्यांनाही वाटोळी गती मिळते. त्यांच्या आणि पाण्याच्या घर्षणामुळे खडकावर वाटोळा खळगा तयार होऊ लागतो. तो खोलखोल होऊ लागतो व पुष्कळदा त्याच्या तोंडापेक्षा आतील भाग जास्त घर्षणामुळे अधिक पोकळ होतो. कधी कधी शेजारशेजारचे दोन खळगे आतून जोडलेही जातात. उन्हाळ्यात जेव्हा हे खडक उघडे पडतात, तेव्हा त्यांवरील कुंभगर्त व त्यांमधील त्यांना खोदून काढणारी निसर्गाची हत्यारे, म्हणजे घर्षणाने स्वत:ही वाटोळे  गुळगुळीत बनलेले दगडगोटे दिसून येतात. महाराष्ट्रात उन्हाळ्यात कोरड्या पडणार्‍या अनेक नद्याओढ्यांच्या पात्रात कुंभगर्त दिसून येतात. पूर्वी खेड्यापाड्यांतील रंगारी रंग तयार करण्यासाठी भांडे म्हणून अशा छोट्या खळग्यांचा उपयोग करीत असत. हिमानी क्रियेत बर्फातून खाली जाऊन खडकांवर घासणाऱ्या दगडांमुळेही कुंभगर्त तयार झालेले दिसून येतात.
          Description: Image result for कुंभगर्त भूगोल

                   धबधबा
धबधबा म्हणजे बऱ्याच उंचावरून थेट खाली पडणारा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह होय. हा प्रवाह प्रामुख्याने नदीचा असतो. नदीचा उगम समुद्रसपाटीपासून खूप उंचावर होतो.येथे नदी खूप वेगाने वाहते, त्यामुळे तिची झीज करण्याची शक्ती जास्त असते. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती, दगडगोटे यांमुळे तसेच तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपप्रवाहांमुळे नदीच्या तळाचे व काठांचे खनन होते.यामुळे धबधबा सारखी भूरूपेतयार होतात.

                Description: G:\Shifen-Waterfall-Taiwan.jpg

        नागमोडी वळणे व नालाकृती सरोवरे
मंद उतारामुळे नदीचा वेग कमी होतो व नदीची वहनक्षमता कमी झाल्यामुळे ती संथपणे वाहू लागते. लहानशा अडथळ्यांनादेखील वळणे (नागमोडी) घेत नदीचा प्रवाह पुढे जात असतो.नदी समुद्राजवळ पोहोचेपर्यंत तिचे पात्र खूप रुंद होते व तिचा वेग खूपच कमी होतो .नदीतला गाळ तिच्या पात्रात व काठावरील प्रदेशात साठतो .नदीतील गाळाचे संचयन होण्यासाठी नदीची लांबी, पाण्याचे प्रमाण,नदीतील गाळाचे प्रमाण आणि भूपृष्ठाचा व नदीचा उतार इत्यादी घटक आवश्यक असतात.

            Description: Image result for नदी भूगोल
                             पूरतट व पूरमैदाने
पुराच्या वेळी नदीची खननशक्ती बरीच वाढलेली असते. जमिनीचे ढाळमान अधिक असेल, तर पात्राचे अधिक प्रमाणात खनन होते आणि गोटे, वाळू, माती इ. ‘ओझेमोठ्या प्रमाणात ती वाहून नेते. ढाळमान कमी असेल, तर पाण्याचा वेग मंदावतो व नदीची ओझेवाहण्याची शक्ती कमी होते. नदीच्या पात्रात वाळू, माती, गोटे इत्यादींचे संचयन होते. त्यामुळे पुष्कळदा नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो आणि तिच्या वरच्या भागात पाणी फुगते. पुराच्या वेळी नदीकाठावरील ज्या भागात पाणी तुंबून राहते, तेथे प्रवाहाचा वेग कमी असल्यामुळे गाळ, माती इ. साठून पुराचे मैदान तयार होते. अशी मैदाने पुष्कळदा अत्यंत विस्तृत असतात. अमेरिकेतील ओहायओ शहराच्या खालच्या भागात निर्माण झालेले मिसिसिपी नदीचे पूरमैदान सु. १२९ किमी. रुंद आहे. तिच्या दोन्ही बाजूंस सामान्यपणे पूरतट तयार झालेले आढळतात. नदीचे पाणी वाढले, की काही वेळा हे पूरतट फुटतात व भोवतालच्या पूरमैदानात पाणी पसरते. ह्‌वांग हो, मिसिसिपी, पो, गंगा या नद्यांचे पूरतट वारंवार फुटत असल्याने त्यांच्या पूरमैदानांचे अतोनात नुकसान होते. पूरतटांच्याच अडथळ्यांमुळे पूरमैदानात पसरलेले पाणी पुष्कळदा नदीप्रवाहात लवकर परतू शकत नाही; त्यामुळे पुराची अवस्था जास्त दिवस टिकते.
       

                                 त्रिभुज प्रदेश
त्रिभुज प्रदेश त्रिभुज प्रदेश  म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणीप्रदेश होय. मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश नदीच्या पात्राला सहसा अनेक प्रवाहांमध्ये विभागतात. त्रिभुज प्रदेशाची निर्मिती ही नदीवर अवलंबून असते. या प्रदेशातील जमीन गाळाची व बहुधा दलदलयुक्त असते. एखाद्या नदीच्या मुखाजवळ तयार होणाऱ्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती खालील घटकांवर अवलंबून असते :
      नदीतील गाळाचे प्रमाण
      नदीचा मुखाजवळील वेग
      सागराची खोली
      त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्य
      सागरप्रवाह
             Description: G:\1280px-Amu_darya_delta.jpg

                   हिमनदी
हिमनदी अथवा बर्फाची नदी ही शब्दश: बर्फाची नदी असते. याला इंग्रजीत ग्लेशियर असे म्हणतात. हिमनदीचे थोडे पाणी वितळून ते नदीच्या तळापाशी जाते पण वरती बर्फाचे अस्तर राहतेच. या बर्फाच्या अस्तराच्या तळावर या पाण्याचा वंगणासारखा परिणाम (Lubrication) होऊन घर्षण कमी होते व अतिप्रचंड बर्फाचा थर उताराच्या दिशेने घसरू लागतो. सामान्य नदी/ओहोळाप्रमाणे वेग नसला तरी या हिमनदीमध्ये हे बर्फाचे अस्तर वार्षिक २ ते २.५ किमी पर्यंत हलते. अश्या हिमनद्या हिमालयआल्प्सअँडीझरॉकीहिंदुकुश पर्वतरांग या पर्वत रांगांमध्ये आहेत. याशिवाय ध्रुवीय प्रदेशात अतिथंडीमुळे सपाट प्रदेशांतही हिमनद्या आढळतात. ध्रुवीय प्रदेशातील हिमनद्या आकाराने व लांबीनेही मोठ्या असतात. जागतिक तापमानवाढीनेहिमनद्यांच्या वितळ्याचा वेग बऱ्याच प्रमाणात वाढला आहे.
             Description: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/3f/155_-_Glacier_Perito_Moreno_-_Panorama_de_la_partie_nord_-_Janvier_2010.jpg/1400px-155_-_Glacier_Perito_Moreno_-_Panorama_de_la_partie_nord_-_Janvier_2010.jpg

                                        हिमगव्हर
हिमगव्हर -  हिमगव्हर हे हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे. पर्वतउतारावरील तळाकडील भागात उताराची व कडांची झीज झाल्यास कालांतराने या भागास आरामखुर्चीसारखा आकार प्राप्त होतो. त्यास हिमगव्हर असे म्हणतात.
              Description: F:\download.jpg
                              शुककूट व गिरिश्रुंग
शुककूट शुककूट हे हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.
 नजीकच्या दोन हिमगव्हरांमधील कडे झीज होऊन धारदार बनल्यास ते एखाद्या करवतीसारखे दिसतात. त्यास शुककूट असे म्हणतात.
गिरिश्रृंग -
 गिरिश्रुंग हे हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.पर्वतउतारावर दोनपेक्षा अधिक बाजूस हिमगव्हर तयार झाले तर त्यांच्यामधील उतार तीव्र होतात आणि तेथील शिखराचा भाग एखाद्या शिंगासारखा भासतो. त्यास गिरिशृंग असे म्हणतात.
                 Description: Related image

                U आकाराची दरी
हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे. याचा आकार इंग्रजी U सारखा दिसतो; म्हणून त्यास यू आकाराची दरी असे म्हणतात. हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.
           Description: F:\800px-U-shaped_valley_at_the_head_of_Leh_valley,_Ladakh.JPG

                                      लोंबती दरी
हिमनदी हिमनदीच्याच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे. मुख्य हिमनदीला येऊन मिळणाऱ्या उपहिमनदीमुळे लोंबती दरी तयार होते. या प्रकारच्या द-या लोंबत असल्यासारख्या दिसतात म्हणून त्यांना लोंबत्या द-या असे म्हणतात .
               Description: https://rajeshivchhatrapati.files.wordpress.com/2012/03/torana.jpg?w=690

               हिमोढ
हिमनदी वाहताना आपल्या बरोबर गाळ वाहूनआणते. या गाळास हिमोढ म्हणतात. हिमोढाचे संचयनाच्या स्थानानुसार भू-हिमोढ, पार्श्व हिमोढ, मध्य हिमोढ व अंत्य हिमोढ असेचार प्रकार होतात.

               Description: G:\download (3).jpg
                                  हिमोढगिरी
भू-हिमोढामुळे तयार झालेल्या लंबगोलाकार टेकड्यांस हिमोढगिरी होत. हे हिमनदीच्या संचयन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.

               
                      
                               हिमोढकटक
काही वेळेस हिमोढाच्या संचयनातून तयार झालेल्या नागमोडी वळणाच्या व तीव्र उताराच्या लांबच लांब टेकड्यांस हिमोढकटक असे म्हणतात. हे हिमनदीच्या संचयन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.
              Description: Image result for हिमोढकटक

                                         वारा
हवेच्या हालचालीस वारा म्हणतात .वारा हे वायुरूप बाह्यकारकआहे. वाऱ्याचे खनन, वहन व संचयनकार्य मुख्यत: वाळवंटी व कमी पावसाच्या क्षेत्रात जास्त प्रभावीपणे आढळते. या प्रदेशात कायिक विदारण जास्त प्रमाणात असल्याने खडकांचा भुगा व वाळू मोठ्या प्रमाणात पसरलेली असते. येथे वाऱ्याच्या वहनकार्यात अडथळा कमी असतो  वाऱ्याबरोबर वाळूच्या कणांचे वहन होत असते. वाळूचे कण खूप दूरपर्यंत वाहून नेले जातात व ज्याठिकाणी वाऱ्याचा वेग कमी होतो , अशा ठिकाणी वाळूचे संचयन होते. अशाप्रकारे वारा खनन, वहन व संचयनाचे कार्य करतो .
                    Description: G:\download (5).jpg

                              अपक्षरण खळगे
  वा-याच्या अपवहन प्रक्रियेमुळे एका ठिकाणची वाळू दुस-या ठिकाणी वाहून नेली जाते तेथे खोल खळगा तयार होतो त्यास अपक्षरण खळगे म्हणतात. उदा. इजिजप्तमधील कतारा खळगा तयार झाला आहे. यामुळे मरुद्यानाची निर्मिती होते.
                  Description: Image result for अपक्षरण  खळगे

                भूछत्र खडक
खडकाचे वाऱ्याच्या घर्षणामुळे होणारे एक भूरूप आहे. खडकास छत्री सारखा आकार प्राप्त झाल्याने त्यास भूछत्र खडक असे म्हणतात. भूछत्र खडक - वा-याबरोबर येणा-या कणांचा आघात मागार्यात येणाया उंच खडकांवर होतो. खडकाचे जमनीलगत घर्षण झाल्यामुळे या भूछत्र खडकाची निर्मीती होते.
               Description: File:Timna 5.JPG

                                      यारदांग 
 वाळवंटात ज्या ठिकाणी कठीण आणि मृदू खडक हे लंबवत स्थितीत वाऱ्याच्या दिशेला समांतर व एकानंतर एक असतील किंवा एकमेकांना समांतर असतील तर अशा वेळी वाऱ्याच्या खननकार्यामुळे मृदू खडकाची जास्तीत जास्त झीज होऊन मृदू खडक किंवा स्तर नाहीसा होऊन यारदांग तयार होतात. अशी यारदांगे मध्य आशिया खंडातील गोबीच्या वाळवंटात, दक्षिण अमेरिकेतील अटाकामाच्या वाळवंटात आढळतात.
               

                                     वालुकागिरी
 वाळवंटी प्रदेशात खनन झालेले पदार्थ वारा आपल्याबरोबर वाहत नेतो व वाऱ्याच्या वेग जेथे कमी होतो तेथे या सर्व पदार्थाचे संचयन होते. वाऱ्याच्या अशा संचयनामुळे वाळूच्या टेकडय़ांची निर्मिती होते. अशा टेकडय़ांना वालुकागिरी असे म्हणतात. अशा टेकडय़ांची वाऱ्याकडील बाजू मंद उताराची असते तर विरूद्ध बाजू तीव्र उताराची असते. या वालुकागिरीचे स्थलांतर होत असते. त्या वाऱ्याबरोबर पुढे पुढे सरकत असतात.
                
                बारखान
 वारा वाहत असताना वाऱ्याच्या मार्गात लहान झाड किंवा मोठा दगड आल्यास वाऱ्याबरोबर आलेल्या काही पदार्थाचे वाऱ्याच्या दिशेला संचयन होते. त्यामुळे चंद्रकोर आकाराच्या वाळूच्या टेकडय़ा निर्माण होतात. अशा चंद्रकोर टेकडय़ांना बारखाणअसे म्हणतात. या टेकडय़ांची वाऱ्याकडील बाजू मंद उताराची असते तर विरुद्ध बाजू तीव्र व अंतर्वक्र उताराची असते. बारखाण वेगवेगळे किंवा समूहाने दिसतात. अशी बारखाण अरेबियाच्या वाळवंटी प्रदेशात, इराण, सहारा, वाळवंटी प्रदेशात आढळतात.
               Description: Related image

              सैफ टेकड्या
अरेबियन भाषेत सैफ म्हणजे तलवार होय . वाऱ्याच्या दिशेने लांबवर होणाऱ्या निक्षेपणातून लांबट आकाराच्या वाळूकागिरीची निर्मिती होते . या टेकड्या कमी उंचीच्या व काही किमीपर्यंत पसरलेल्या आढळतात .
             

                                 लोएस मैदान
वाळवंटी प्रदेशात अनेक सूक्ष्म कण वाऱ्याबरोबर दूपर्यंत वाहून नेले जातात. वाळवंटी प्रदेशाच्या पलीकडे त्यांचे संचयन होऊन बारीक किंवा सूक्ष्म कणांचा थर तयार होऊन मदान तयार होते, त्याला लोएस मदानअसे म्हणतात. अतिसूक्ष्म कणांच्या संचयनापासून लोएस मैदान तयार होते. या कणांचा रंग फिकट पिवळा असतो. हे मदान सुपीक असते. गोबीच्या वाळवंटी प्रदेशातून वाऱ्याबरोबर वाहून आलेल्या सूक्ष्म कणांपासून चीनच्या उत्तर भागात अशी लोएस मदाने तयार झाली आहेत.
              Description: Related image


              अशा प्रकारे वरील सर्व घटक अपक्षरण कारके – १ मधील आहे .


            @ धन्यवाद @

                        

टिप्पण्या